कोलकाता : पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे 13 वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल 15.50 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली.


दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बँगलोरने 10 कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे 8.50 कोटी आणि 7.75 कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. याचदरम्यान काही दिग्गद खेळाडूंना संघमालकांनी आपल्या संघात घेण्यास नापसंती दर्शवली. आंतरराष्ट्रीय मैदानं गाजवणारे अनेक खेळाडून अनपेक्षितपणे UNSOLD राहिले.


UNSOLD राहिलेले दिग्गज खेळाडू




  1. शे होप–वेस्ट इंडिज

  2. केजरिक विल्यम्स–वेस्ट इंडिज

  3. जेसन रॉय –वेस्ट इंडिज

  4. कार्लोस ब्रॅथवेट –वेस्ट इंडिज

  5. जेसन होल्डर - वेस्ट इंडिज

  6. टीम साऊदी –न्यूझीलंड

  7. कॉलिन डी ग्रँडहोम – न्यूझीलंड

  8. मार्टिन गप्टिल – न्यूझीलंड

  9. कॉलिन मुनरो –न्यूझीलंड

  10. कॉलिन डी ग्रॅण्डहोम –न्यूझीलंड

  11. मार्क वूड–इंग्लंड

  12. अॅडम झांपा - ऑस्ट्रेलिया

  13. मुस्तफिजूर रहमान –बांगलादेश

  14. मुश्फिकूर रहिम –बांगलादेश

  15. कुशल परेरा - श्रीलंका


48 वर्षांचा प्रवीण तांबे केकेआरकडे
मुंबईचा अनुभवी लेग स्पिनर प्रवीण तांबेनं वयाच्या 48 व्या वर्षी आयपीएलच्या रणांगणातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला आगामी आयपीएलसाठी आपल्या संघात स्थान दिलं आहे. कोलकात्यानं तांबेला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करुन घेतलं. प्रवीण तांबे हा सध्या 48 वर्षांचा आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये खेळणारा तांबे हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे. प्रवीण तांबेनं याआधीही आयपीएलच्या काही मोसमांत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.


उनाडकटचा भाव घसरला
सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आयपीएलच्या लिलावात यंदा अवघी तीन कोटी रुपयांची बोली आली. राजस्थान रॉयल्सनं गेल्या मोसमासाठी उनाडकटला तब्बल साडेअकरा कोटींचा चढा भाव दिला होता. पण त्याच्या निराशानजक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राजस्थाननं त्याला करारमुक्त केलं होतं. त्याच राजस्थाननं उनाडकटला यंदाच्या लिलावात तीन कोटी रुपयांत पुन्हा विकत घेतलं आहे.