आयपीएलच्या 13व्या मोसमाची सुरुवात पुढच्या वर्षी म्हणजेच, मार्च 2020 मध्ये होणार आहे. आज होणाऱ्या लिलावात खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. या लिलावात युवा खेळाडूंसह वरीष्ठ खेळाडूंचाही समावेश असणार आहे. 18 वर्ष ते 48 वर्षांच्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या फ्रेंचायजींमध्ये चढाओढ रंगणार आहे.
वरिष्ठ आणि युवा खेळाडूंमध्ये चुरस
यंदाच्या लिलावात सर्वात वरिष्ठ खेळाडू भारताचा 48 वर्षीय प्रवीण तांबे असणार आहे. तसेच सर्वात युवा खेळाडू अफगाणिस्तानचा नूर अहमद आहे. नूर अहमद 14 वर्षांचा आहे. प्रवीण तांबे आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन संघामधून खेळला आहे. त्याने 33 सामने खेळला असून 28 विकेट्सही घेतले आहेत. एका हॅट्रिकचाही समावेश आहे. तसेच नूर एक चायनामॅन बॉलर आहे आणि त्याची बेस प्राइज 30 लाख रूपये आहे.
या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर :
1. ग्लॅन मॅक्सवेल : 2 कोटी
2. शिमरॉन हेटमायर : 50 लाख
3. जेसन रॉय : 1.5 कोटी
या युवा खेळाडूंवर असेल लक्ष :
1. यशस्वी जायस्वाल : अवघ्या 18 वर्षांचा यशस्वीने लिस्ट ए सामन्यांमध्ये डबल सेन्चुरी केली होती.
2. प्रियम गर्ग : 19 वर्षांचा प्रियम भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार आहे. टी20 सामन्यांमध्ये त्याचा 133 स्ट्राइक रेट आहे.
3. ईशान पारेल : ताशी 140 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा ईशान 21 वर्षांचा आहे.
कोणत्या फ्रेंचायझी लावणार बोली?
इंडियन प्रीमियर लीग 2020च्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, मुंबई इन्डियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या फ्रेंचायजी बोली लावणार आहेत.
कोणत्या खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली?
आतापर्यंतच्या मोसमांमध्ये अनेक खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावासाठी सर्वाधिक बोली लागणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनेकांचा समावेश आहे.
- 2008 : महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स), 9.5 कोटी
- 2009 : केविन पीटरसन, एड्र्यू फिल्टॉफ, 9.8 कोटी
- 2010 : कीरोन पोलार्ड (मुंबई इन्डियन्स), 3.5 कोटी
- 2011 : गौतम गंभीर (कोलकाता नाइट राइडर्स), 11.04 कोटी
- 2012 : रवींद्र जाडेजा (चेन्नई सुपर किंग्स), 12 कोटी
- 2013 : ग्लेन मॅक्सवेल(मुंबई इन्डियन्स), 5.3 कोटी
- 2014 : युवराज सिंह (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू), 14 कोटी
- 2015 : युवराज सिंह (दिल्ली डेअरडेविल्स), 16 कोटी
- 2016 : शेन वॉटसन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू), 9.5 कोटी
- 2017 : बेन स्टोक्स (रायझिंग पुणे सुपरजाएंट्स), 14.5 कोटी
- 2018 : बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स), 12.5 कोटी
- 2019 : जयदेव उनादकट, वरुण चक्रवर्ती, 8.4 कोटी