IPL 2021: आयपीएल 2021 अर्थात क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात होण्यापूर्वीच हे पर्व बहुविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या काही दिवसांनीच आयपीएलची सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी संघांममध्ये झालेले काही महत्त्वपूर्ण बदल पाहता आयपीएलचं जेतेपद पटकावण्यासाठीच प्रत्येक संघाचा प्रयत्न असणार आहे. यासाठी संघ तयारीलाही लागले आबेत. यातच राजस्थान रॉयल्स या संघातील खेळाडू राहुल तेवतिया याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 


राजस्थान संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या राहुल क्वारंटाईनमध्ये आहे. त्यामुळं तो हॉटेलच्या रुममध्येच राहत आहे. हॉटेल रुममध्ये असताना राहुल त्याच्या रुमचा व्हिडीओ बंद करणंच विसरु गेला ज्यामुळं आता तोच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल कुठं फोनवर बोलताना दिसत आहे, कुठं व्यायाम करताना दिसस आहे तर मध्येच फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. 


राहुलला वाटतंय की त्याला कोणीही पाहत नाहीये... असं कॅप्शन लिहित राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर राहुलची ही ऑफ फिल्डींग कामगिरी चांगलीच चर्चेत आली असून, हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. बरं य़ावर अनेकजण धम्माल कमेंट्सही करत आहेत. 


आयपीएलमध्ये राहुल तेवतियाच्या कारकिर्दीबाबत सांगावं तर, आतापर्यंत तो या स्पर्धेत 14 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्यानं 255 धावा केल्या आहेत. राहुलच्या नावे 10 विकेटचीही नोंद आहे. आता यंदाच्या हंगामात तो या आकड्यांमध्ये नेमकी कशी आणि किती भर टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 






IPL 2021 : आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेला धक्का, 'या' ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार


दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगमात दोन संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. तर सहा संघांच्या कर्णधारांनी मागील हंगामातही संघाचं नेतृत्व केलं होतं. राजस्थान रॉयल्सने यावेळी संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे.  त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.