IPL 2021, DC vs MI : आयपीएलमधील मुंबई आणि दिल्ली यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेलेला सामना दिल्लीनं सहा विकेट्सनं जिंकला आहे. मुंबईने दिल्लीला 138 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान मैदानात उतरलेल्या दिल्लीने 19.1 ओव्हरमध्येच संपुष्ठात आणले.
दिल्लीकडून शिखर धवने चांगली फलंदाजी केली तर अमित मिश्राने चार महत्त्वपूर्ण विकेट घेतले. ललित यादवने 25 बॉलमध्ये नाबाद 22 धावा केल्या आणि शिमरोन हेटमेयरने 79 बॉलमध्ये नाबाद 14 धावा केल्या आहेत.
त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी आजच्या सामन्यातही दिसली. रोहित शर्मावगळता इतर मुंबईचा इतर कोणताही फलंदाजी क्रिजवर टिकलाच नाही. मुंबईच्या संघाला 137 धावांवर रोखण्यात अमित मिश्राने महत्त्वाीच भूमिका निभावली. अमित मिश्राने 4 षटकांत 24 धावा देत 4 विकेट घेतल्या.
मुंबईकडून रोहितने सर्वाधिक 44 धावा केल्या. तिसऱ्या षटकात क्विंटन डिकॉक बाद झाल्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादवने मुंबई डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव 24 धावांवर बाद झाला. सूर्यकुमारनंतर रोहितही बाद झाला. त्यानंतर मुंबईची फलंदाजाची खालची फळी मोठी कामगिरी करु शकली नाही. डावाच्या शेवटी ईशान किशन आणि जयंत यादवने अनुक्रमे 26 आणि 23 धावा करुन मुंबईची धावसंख्या 137 पर्यंत पोहोचवली.