IPL 2020 RCB vs KKR : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. केकेआरने आपल्या शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा तर आरसीबीने सीएसकेला पराभूत केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांची नजर विजयाच्या दिशेने आणि प्ले-ऑफच्या शर्यतीत आपला प्रवास सुकर करण्याकडे असणार आहे.


सुरुवातीला बंगळुरूची कामगिरी तितकी चांगली नव्हती, परंतु हळूहळू या संघाने लय मिळविली आणि आता संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मागील तीन सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आपला फॉर्म दाखविला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराटने नाबाद 90 धावा केल्या आणि संघाला मजबूत धावसंख्या दिली होती.


कोहली व्यतिरिक्त बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल सुरुवातीपासूनच त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. एरॉन फिंच सलामीचा फलंदाज आहे. फिंच चेन्नईविरुद्ध अपयशी ठरला होता, परंतु फिंचनेही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या संघात अब्राहम डीव्हिलियर्सच्या रूपात आणखी एक स्टार फलंदाज आहे. गोलंदाजीतही कोहलीच्या संघाला फारशी चिंता करण्याची गरज नाही.


कोलकाताकडे सुनील नरेन आणि वरुन चक्रवर्ती या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. सुनिलने गेल्या सामन्यात दोन चांगली षटक टाकली होती. आज कोलकाताच्या गोलंदाजांचा मुकाबला सर्वोत्तम फलंदाजांविरुद्ध होत आहे. कोलकाताकडे शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे जलद गोलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत चागंली गोलंदाजी केली आहे. त्याच्या जोडीला पॅट कमिन्स आणि कमलेश नागरकोटी हे असतीलच. केकेआरसाठी रसेल हुकमी खेळाडू आहे. मात्र असे असले तरी अद्याप तो आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करु शकलेला नाही.


संभाव्य संघ :


कोलकाता नाइट राइडर्स : दिनेश कार्तिक (कॅप्टन), आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शुभमन गिल, लॉकी फग्र्यूसन, नीतीश राणा, रिंकू सिंह, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, अली खान, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, सिद्देश लाड, पैट कमिंस, इयोन मोर्गन, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, निखिल नाइक, क्रिस ग्रीन.


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कॅप्टन), एरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, अब्राहम डिविलियर्स, जोशुआ फिलिपे, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, नवदीप सैनी, उमेश यादव, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, मोइन अली, पवन देशपांडे, गुरकीरत सिंह मान, मोहम्मद सिराज, क्रिस मौरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, शहबाज अहमद, इसुरु उदाना, एडम जाम्पा, केन रिचर्डसन