IPL 2020 Point Table: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर प्ले ऑफचं चित्र स्पष्ट होत आहे.  किंग्स इलेवन पंजाबनं हैदराबादवर रोमांचक विजयासह  प्ले ऑफच्या रेसमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर  मुंबई इंडियंस 14 गुणांसह आणि +1.448 नेट रन रेटसह पहिल्या नंबरवर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह आणि +0.434 नेट रनरेटसह दुसऱ्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 गुणांसह  +0.182  नेट रन रेटमुळं तिसऱ्या स्थानावर आहे.  केकेआर 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर सलग चार विजय मिळवून पंजाब देखील या रेसमध्ये कायम आहे. किंग्स इलेवन पंजाब  10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

या संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात
सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तीन संघाचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.  हैदराबाद  8 गुण आणि +0.029 नेट रन सह सहाव्या स्थानी तर राजस्थान रॉयल्स 8 गुण आणि -0.620  नेट रन रेटसह सातव्या स्थानी आहे. तर चेन्नई सहा गुणांसह सर्वात शेवटी आहे. या तीन संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

केएल राहुलकडे ऑरेंज कॅप तर पर्पल कॅप रबाडाकडे

केएल राहुलने यंदाच्या सीझनमध्ये 11 सामन्यांत 567 धावा करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला आहे. तर दोन शतक लगावणारा शिखर धवन या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आला आहे. शिखरनं 471 धावा केल्या आहेत. तर मयंक अग्रवाल 398 धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडानं आपला दावा आणखी मजबूत केला आहे. त्याचा जवळपास देखील दुसरा गोलंदाज नाही.  रबाडा 11  सामन्यांत 23 विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  आहे, त्याने 10 सामन्यांत 17 विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर  किंग्स इलेव्हन पंजाब संघातील मोहम्मद शमीने देखील 11 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत.