IPL 2020 : आयपीएलमध्ये होत असलेल्या रंगतदार लढतींमुळे प्वाईंट्स टेबलमध्ये सातत्याने बदल होत आहेत.  आयपीएलमध्ये सलग तीन विजय मिळवत तळाला गेलेल्या पंजाबनं पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. काल दिल्लीचा पराभव करत पंजाबनं पाचवं स्थान प्राप्त केलं. मात्र दिल्लीचा पराभव झाला असला तरी ते 14 अंकांसह प्वाईंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. तर तीन वेळा आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल 2020 मध्ये मात्र फारशी चांगली कामगिरी करताना दिसलेला नाही. त्यामुळं चेन्नई तळाला आहे.


दिल्ली कॅपिटल्स पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर


दहा सामने खेळल्यानंतर सात विजय आणि तीन पराभवासह दिल्ली कॅपिटल्स 14 गुण घेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईच्या संघाने नऊ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे. ज्यांनी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान, बंगलोरचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी आहे. चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. ज्यांनी नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आता आठ गुणांसह पंजाब पाचव्या क्रमांकावर आला आहे. राजस्थानचे देखील 8 गुण आहेत. मात्र नेट रनरेट कमी असल्याने ते सहाव्या नंबरवर आहेत. तर हैदराबाद सहा गुणांसह सातव्या नंबरवर आहे.


केएल राहुल टॉपवर


केएल राहुलने यंदाच्या सीझनमध्ये 10 सामन्यांत 540 धावा करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला आहे. तर दोन शतक लगावणारा शिखर धवन या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आला आहे. शिखरनं 465 धावा केल्या आहेत. तर मयंक अग्रवाल 398 धावा करत तिसऱ्या आणि डु प्लेसी 375 धावांसोबत चौथ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली 347 धावा करत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडानं आपला दावा आणखी मजबूत केला आहे.  रबाडा 10  सामन्यांत 21 विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर किंग्स इलेव्हन पंजाब संघातील मोहम्मद शमी आहे. ज्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  9 सामन्यांत 15 विकेट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.