IPL 2020 MI vs CSK: इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनला आज सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अबूधाबी येथे सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांनी जगभरातील कोरोना महामारीविरोधात लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सना सलाम केला.


त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सकडून डाव सुरू केला चेन्नई सुपरकिंग्जकडून वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सुरुवात केली. दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चौकार लगावला. यासह चहरच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.


IPL 2020, MI vs CSK LIVE: सामना कधी आणि कुठे पाहता येईल?


दीपक चहर असा गोलंदाज बनला ज्याने सलग तीन सीजन आयपीएलमधील पहिला चेंडू टाकला. याआधी कोणत्यांही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. चहरने आयपीएल 2018 मध्ये मुंबईविरुद्ध सीजनमधील पहिला चेंडू टाकला. त्याच वेळी, आयपीएल 2019 मध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सीजनचा पहिला चेंडू टाकला आणि यंदा पुन्हा मुंबई विरुद्ध त्याने सीजनचा पहिला चेंडू टाकला.


दीपक चहरच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 35 सामन्यांत 33 विकेट्स घेतल्या आहेत. यात चहरची सरासरी 27.15 आणि स्ट्राइक रेट 21.21 आहे.


मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्ज समोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईची धावसंख्या रोखण्यात दक्षिण आफ्रिकेच्या लुन्गिसानी एन्गिडीने महत्त्वाची कामगिरी केली. मुंबई इंडियन्स कडून सौरभ तिवारीने 31 चेंडूत सर्वाधिक 42 धावा केल्या. त्यानंतर क्विंटन डि कॉकने 20 चेंडूत 33 धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एंगिडी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर दीपक चहर, रवींद्र जाडेजाने प्रत्येकी दोन आणि सॅम कुर्रान, पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.