इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनचं बिगूल आज यूएई मध्ये वाजणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघात दुसऱ्यांदा दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर सामना होणार आहे. 2014 साली जेव्हा यूएईमध्ये आयपीएल शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यावेळ मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली होती.


मुंबईचा यूएईमध्ये खराब रेकॉर्ड


कोरोना महामारीमुळे यंदा इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन सयुंक्त अरब अमिरातमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आयपीएल भारताबाहेर खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दक्षिण अफ्रीकेत खेळवण्यात आली होती. तर 2014 मध्ये सुरुवातीचे सामने यूएई मध्ये खेळवण्यता आले होते. आयपीएल 2020 चा पूर्ण सीजन यूएई मधील दुबई, अबू धाबी आणि शारजाह शहरात होणार आहे.


मुंबई इंडियन्सने आतापर्यंत यूएई मध्ये पाच सामने खेळणार आहे. या पाचही सामन्यात मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाच्या कामगिरीला घेऊन चिंतीत नाही. जुन्या संघातील फक्त दोनच खेळाडू संघात खेळत असल्याचे रोहितने सांगितले.


दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या तुलनेत चेन्नईच्या संघाला यूएईमध्ये चांगले यश मिळाले आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत यूएई मध्ये खेळळ्या गेलेल्या पाच सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसके आपल्या या रेकॉर्डला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.


यूएईमध्ये मुंबई-चेन्नईचा पूर्वीही सामना
यूएई मधील दुबईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये 2014 ला सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 ओवरमध्ये 7 गडी गमावून 141 धावा काढल्या होत्या. बदल्यात चेन्नईच्या टीमने 19 ओवरमध्ये तीन गडी गमावून सामना आपल्या खिशात घातला होता. त्यामुळे आजच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत.