IPL 2020 :  आयपीएलमध्ये काल झालेल्या रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. किंग्ज इलेव्हन पंजाबने हैदराबादला 127 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, प्रत्त्युतरादाखल हैदराबादचा डाव 114 धावांवरचं आटोपला. या सामन्यात विशेष कौतुक झालं ते पंजाबच्या मनदीप सिंहचं.


पंजाबने काल दुखापतग्रस्त मयांक अग्रवालच्या जागी मनदीप सिंहला संघात स्थान दिलं होतं. युवा मनदीपसाठी आजचा सामना सोपा नव्हता. कारण शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचं निधन झालं होतं. मनदीपचे वडील हरदेव सिंह काही दिवसांपासून आजारी होते. काल त्यांचं दुर्देवी निधन झालं. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही कारणांमुळं तो वडीलांच्या अंत्यदर्शनासाठी जाऊ शकला नाही. अशा स्थितीतही मनदीप खेळला. मयांक नसताना ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत सलामीला येईल अशी सर्वांना आशा होती, परंतु पंजाबने युवा मनदीप सिंहला राहुलसोबत संधी दिली. मनदीपने काल 14 चेंडूत 17 धावांची खेळी केली.


KXIP vs SRH IPL 2020 : रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर 12 धावांनी विजय


किंग्ज इलेव्हन पंजाबने हैदराबादला 127 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, प्रत्त्युरादाखल हैदराबादचा संघ 114 धावांवरचं आटोपला. पंजाबच्या ख्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी तीन तर रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 35 धावा केल्या.


तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय हैदराबादच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला आहे. सलामीला आलेला मनदीप 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल 20 धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला कर्णधार के एल राहुल राशिदच्या फिरकीचा बळी ठरला. त्याने 27 धावा केल्या. त्यानंतर एकामागून एक विकेट पडत गेल्या.  निकोलस पूरनने शेवटपर्यंत नाबाद राहत 32 धावा केल्या आणि संघाला 126 धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादच्या राशिद खान, जेसन होल्डर आणि संदीप शर्मा या तिघांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे पंजाबचा संघ 125 धावांत आटोपला.