KXIP vs SRH IPL 2020 : आयपीएल 2020 च्या 43 व्या रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायजर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. किंग्ज इलेव्हन पंजाबने हैदराबादला 127 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, प्रत्त्युरादाखल हैदराबादचा संघ 114 धावांवरचं आटोपला. पंजाबच्या ख्रिस जॉर्डन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी तीन तर रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 35 धावा केल्या.
पंजाबने दिलेल्या 126 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने अर्धशतकी सलामी दिली. पण त्यानंतर लगेचच दोघेही बाद झाले. मनिष पांडे आणि विजय शंकर जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण आव्हान जवळ येत असतानाच हैदराबादच्या संघाला गळती लागली. 16 ते 20 या चार षटकांमध्ये हैदराबादच्या संघाने 17 धावांत तब्बल 7 गडी गमावले.
KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सचा 'दिल्ली'वर विजय; वरुण चक्रवर्ती मॅचचा हिरो
तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय हैदराबादच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला आहे. सलामीला आलेला मनदीप 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल 20 धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला कर्णधार के एल राहुल राशिदच्या फिरकीचा बळी ठरला. त्याने 27 धावा केल्या. त्यानंतर एकामागून एक विकेट पडत गेल्या. मॅक्सवेल (12), हुड्डा (0), ख्रिस जॉर्डन (7) आणि मुरूगन अश्विन (4) झटपट बाद झाले. निकोलस पूरनने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे संघाला 120चा आकडा पार करता आला. निकोलस पूरनने शेवटपर्यंत नाबाद राहत 32 धावा केल्या आणि संघाला 126 धावांपर्यंत मजल मारून दिली. हैदराबादच्या राशिद खान, जेसन होल्डर आणि संदीप शर्मा या तिघांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे पंजाबचा संघ 125 धावांत आटोपला.