मुंबई : सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेट्नी मात करुन यंदाच्या आयपीएल मोसमातला सलग तिसरा विजय साजरा केला. या विजयासह सहा गुण कमवत हैदराबाद गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे.
फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या या सामन्यात दिल्लीने हैदराबादसमोर विजयासाठी 129 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने दिल्लीचं आव्हान पाच विकेट्स आणि नऊ चेंडू राखून पार केलं.
हैदराबादचा कप्तान भुवनेश्वर कुमारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भुवीचा हा निर्णय हैदराबादला फायदेशीर ठरला. 20 षटकांत आठ गडी गमावलेल्या दिल्लीला 129 धावांवर थोपवण्यात हैदराबादला यश आलं.
हैदराबादच्या अचूक माऱ्यासमोर दिल्ली 129 धावांतच गारद झाली. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमा, सिद्धार्थ कौल आणि मोहम्मद नबीनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती. हैदराबादच्या विजयात सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 28 चेंडूंत एक षटकार आणि नऊ चौकार लगावत 48 धावांची खेळी केली. बेअरस्टोची खेळी संघासाठी निर्णायक ठरली.
IPL 2019 : हैदराबादची दिल्लीवर पाच विकेट्सने मात, गुणतालिकेत अव्वल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Apr 2019 11:58 PM (IST)
फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या या सामन्यात दिल्लीने हैदराबादसमोर विजयासाठी 129 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने दिल्लीचं आव्हान पाच विकेट्स आणि नऊ चेंडू राखून पार केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -