मुंबई : आयपीएलच्या बाराव्या पर्वाचं अंशतः वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. 23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीतील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पुढील टाईमटेबल ठरवण्यात येणार आहे. आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज हे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरोधात खेळणार आहेत. चेन्नईत शनिवार 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल. 'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आयपीएलच्या आगामी पर्वाचं पुढील वेळापत्रक जाहीर होईल. 23 मार्च ते 5 एप्रिल या 14 दिवसांच्या कालावधीत 17 सामने खेळवले जाणार आहेत. 24, 30 आणि 31 मार्च या वीकेंडला प्रत्येकी दोन सामने होतील. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या कालावधीत प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार सामने खेळतील.
तारीखदिवसवेळसंघठिकाण
23 मार्चशनिवारसंध्याकाळचेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचेन्नई
24 मार्चरविवारदुपारकोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबादकोलकाता
24 मार्चरविवारसंध्याकाळमुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्समुंबई
25 मार्चसोमवारसंध्याकाळराजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबजयपूर
26 मार्चमंगळवारसंध्याकाळदिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपरकिंग्जदिल्ली
27 मार्चबुधवारसंध्याकाळकोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबकोलकाता
28 मार्चगुरुवारसंध्याकाळरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्सबंगळुरु
29 मार्चशुक्रवारसंध्याकाळसनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्सहैदराबाद
30 मार्चशनिवारदुपारकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्समोहाली
30 मार्चशनिवारसंध्याकाळदिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली
31 मार्चरविवारदुपारसनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुहैदराबाद
31 मार्चरविवारसंध्याकाळचेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्सचेन्नई
1 एप्रिलसोमवारसंध्याकाळकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्समोहाली
2 एप्रिलमंगळवारसंध्याकाळराजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुजयपूर
3 एप्रिलबुधवारसंध्याकाळमुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्जमुंबई
4 एप्रिलगुरुवारसंध्याकाळदिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाददिल्ली
5 एप्रिलशुक्रवारसंध्याकाळरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. कोलकाता नाईट रायडर्सबंगळुरु