बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला यंदाच्या मोसमात सलग सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. कालच्या सामन्यातील पराभवानंतर बंगलोर संघ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. बंगलोरचे समर्थक आपला राग सोशल मीडियावर काढताना दिसत आहेत.


दिल्लीविरुद्ध पराभवानंतर बंगलोरने लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलमध्ये सुरुवातीलाच सलग सहा सामन्यात पराभवाची चव चाखणारा बंगलोर दुसरा संघ ठरला. बंगलोरनं याबाबतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सहा वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. 2013 साली दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सलग सहा सामन्यात पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढवली होती.

प्रदीप शर्मा नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर नाना पाटेकरचा व्हिडीओ शेअर करत बंगलोर संघाची खिल्ली उडवली. ट्वीटमध्ये लिहिलं की, "सध्या बंगलोरचा प्रत्येक फॅन विचार करत आहे. विराट कोहलीबद्दल वाईट वाटतंय. सलग 6 पराभव."


गब्बर नावाच्या एका यूजरने लिहिलं की, "बंगलोरच्या सर्वात खराब गोष्टी.. 1. ट्रॅफिक, 2. सांभर, 3. आरसीबी."


राजू नावाच्या एका यूजरने अनुष्काचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्या ती विजयाची वाट पाहता पाहता म्हातारी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.