विशाखापट्टणम : कुलदीप यादवच्या हॅटट्रिकच्या जोरावर टीम इंडियानं विशाखापट्टणम वन डेत विंडीजचा 107 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला 388 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण चायनामन कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि मोहम्मद शमीच्या प्रभावी माऱ्यामुळे विंडीजचा डाव 280 धावांत आटोपला. कुलदीप आणि शमीनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं तर रविंद्र जाडेजाने दोघांना परत पाठवलं. वेस्ट इंडिजकडून शे होपनं 78 तर निकोलस पूरननं 75 धावांची खेळी केली.


टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं विशाखापट्टणम वन डेत हॅटट्रिक साजरी केली. कुलदीपनं घेतलेली ही वन डे क्रिकेटमधली दुसरी हॅटट्रिक ठरली. त्यानं 33व्या षटकातल्या चौथ्या, पाचव्या आणि पा विंडीजच्या होप, होल्डर आणि जोसेफला माघारी धाडून वन डेत दुसरी हॅटट्रिक नोंदवली. भारतीय गोलंदाजानं वन डेत हॅटट्रिक घेण्याची ही पाचवी वेळ ठरली.

हे ही वाचा - विक्रमादित्य रोहित | 'हिटमॅन'ची गांगुली, जयसूर्याशी बरोबरी तर धोनी, विराटचे रेकॉर्ड मोडले

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने सावध सुरुवात केली. एविन लुईस आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी परतल्यानंतर मागील सामन्याचा हिरो हेटमायर आणि रोस्टन चेस स्वस्तात बाद झाले. यानंतर पूरन आणि होप यांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी रचत विंडीजच्या आशा पल्लवीत ठेवल्या. दोन्ही फलंदाजांनी यादरम्यान आपली अर्धशतकं लगावली. डाव स्थिरावत असल्याचे दिसत असतानाच   मोहम्मद शमीने एकाच षटकात निकोलस पूरन आणि कर्णधार पोलार्डला माघारी धाडत सामना भारताकडे वळवला. यानंतर कुलदीप यादवने सामन्याच्या 33 व्या षटकात शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांची विकेट घेत विजयावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले. विंडीजकडून पूरन 75  तर होपने 78 धावा केल्या.

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं विशाखापट्टणम वन डेत हॅटट्रिक साजरी केली. कुलदीपनं घेतलेली ही वन डे क्रिकेटमधली दुसरी हॅटट्रिक ठरली. त्यानं 33व्या षटकातल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विंडीजच्या होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला माघारी धाडून विक्रमी हॅटट्रिक साजरी केली. भारताकडून नोंदवण्यात आलेली ही वन डेतली आजवरची पाचवी हॅटट्रिक ठरली. याआधी चेतन शर्मा, कपिल देव, शमी मोहम्मद शमी आणि कुलदीपनंच हा पराक्रम गाजवला होता. कुलदीपनं 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली हॅटट्रिक घेतली होती.

हे ही वाचा -  IND vs WI: शून्यावर बाद होऊनही विराटनं रचला विक्रम, 'ही' कामगिरी करणारा 8वा भारतीय खेळाडू

त्याआधी दुसऱ्या वन-डे सामन्यातही पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पोलार्डचा हा निर्णय यावेळी योग्य ठरला नाही. टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीरांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 387 धावांचा डोंगर रचला. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं 28वं शतक साजरं केलं. तर लोकेश राहुलनं तिसरं शतक ठोकलं. दोन्ही सलामीवीर रोहित आणि राहुलने दमदार खेळी करत पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. शतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने 104 चेंडूत राहुलच्या 102 धावा केल्या. या शतकी खेळीत राहुलने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर रोहितने 138 चेंडूत 159 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. या दोघांची शतकं आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली.