इंदूर : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने इंदूर कसोटीत शानदार शतक ठोकलं आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकूण तेरावं आणि न्यूझीलंडविरुद्धचं तिसरं शतक ठरलं आहे.

कोहलीला या खेळीदरम्यान अजिंक्य रहाणेनेही उत्तम साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी गौतम गंभीरने 29 धावांची आणि चेतेश्वर पुजाराने 41 धावांची खेळी केली. तर मुरली विजय 10 धावांवर बाद झाला.

टीम इंडियाने या सामन्यात पहिल्या दिवसअखेर 267 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विराट 103 धावांवर तर अजिंक्य 79 धावांवर खेळत होता.