Indonesia Open 2021: भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधु (PV Sindhu) इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धेतून बाहेर झाली. उपांत्य फेरीत पी.व्ही सिंधुला पराभूत करून थायलँडच्या रेचानोक इंतानोननं (Ratchanok Intanon) अंतिम फेरीत प्रवेश केलाय. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोननं तिला 54 मिनिटात 15-21, 21-9 आणि 21-14नं पराभूत केलं.
पीव्ही सिंधूनं या सामन्यात चांगली सुरुवात करत 8-3 ची आघाडी घेत पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर इंतानोननं दुसऱ्या सेटमध्ये रेचानोक 11-7 ची आघाडी घेतली आणि 10 पैकी 9 गुण मिळवत दुसरा सेट आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, सामन्याच्या अखिरेस इंतानोननं आक्रमक खेळी केली. या सेटमध्ये इंतानोननं पी.व्ही सिंधुला 21-14 फरकानं पराभूत केले आणि इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूला सलग तिसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागलाय. या वर्षात चार वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावं लागलंय. पीव्ही सिंधुला यापूर्वी बीडब्ल्यूएफ, फ्रेंच ओपन, इंडोनेशिया मास्टर्स आणि आता इंडोनेशिया ओपनमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तर, तिला सलग तिसऱ्या उपांत्य फेरीत इंतानोनविरुद्ध पराभवाला सामोरे जावा लागलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Indonesia Open 2021: पी.व्ही सिंधूची इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, जर्मनीविरुद्ध एकहाती विजय
- India tour of South Africa : भारतीय क्रिकेट संघाच्या आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर, बीसीसीआयसह क्रिडामंत्री ठाकूर यांची माहिती
- IND vs NZ : भारतीय संघाला यष्टीरक्षकाचा नवा पर्याय, टी20 नंतर कसोटीमध्येही कमाल कामगिरी