AFC Under 19 Womens Football Qualifiers: 24 ऑक्टोबर रोजी बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघानं भारतीय क्रिकेट संघाचा पराभव करत इतिहास रचला. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर भारतीय संघाच्या पराभवाचं मंथन करण्यात आलं. नेटकऱ्यांनी काही खेळाडूंना ट्रोल करण्यात धन्यता मानली. पण, याच दिवशी भारताच्या एका संघानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. 24 ऑक्टोबरला भारतीय संघाच्या पराभवाची चर्चा सुरु असतानाच भारतीय महिला फुटबॉल संघाच्या तीन वर्षांपूर्वीच्या विजयाची चर्चा सुरु झाली. 24 ऑक्टोबर 2018 रोजी झालेल्या आशिया कप फुटबॉल क्वालिफाय सामन्यात भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने पाकिस्तान महिला संघाला तब्बल 18-0 च्या फरकाने धूळ चारली होती. 24 ऑक्टोबरला पाकिस्तान संघानं भारताचा पराभव केल्यानंतर भारताच्या या विजयाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. 2018 मध्ये थायलंडमध्ये अंडर-19 महिला फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं पाकिस्तानवर एकहाती विजय नोंदवला होता.
24 ऑक्टोबर रोजी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पराभव करत पाकिस्तानच्या संघानं इतिहास रचला होता. काही नेटकऱ्यांनी याच दिवशी भारतीय महिला फुटबॉल संघानं पाकिस्तानचा दारुण पराभव केल्याचं शोधून काढत पुन्हा एकदा चर्चा सुरु केली. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडून झालेला पराभव विराट कोहलीच्या करियरमध्ये नकोशा सामन्यापैकी एक आहे. पण हाच दिवस विराट कोहलीसाठी खास आहे. कारण 24 ऑक्टोबर रोजी विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात वेगानं दहा हजार धावांचा टप्पा पार केला होता. विराट कोहलीनं याच दिवशी सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला होता.
2018 मध्ये एएफसी अंडर-19 मधील पाकिस्तानविरोधातील सामन्यावर भारतीय महिला फुटबॉल संघाने सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली होती. भारतीय महिला संघाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत पाकिस्तानचा पराभव केला होता. पहिल्या मनिटांपासून भारतीय संघानं पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. भारताकडून सर्वाधिक पाच गोल रेनू हिने केले होते. त्याशिवाय, मनीषाने तीन, देवनीताने दो, दयाने दोन, रोजाने दोन तसेच पपकी, जबामानी आणि सौम्या यांनी प्रत्येकी एक एक गोल केला होता. पहिल्या हापमध्ये भारतीय संघाने 0-9 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी भारतीय संघाने शेवटपर्यंत कायम ठेवली होती.