Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. शोएब मलिकने जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. घटस्फोटाच्या एका वर्षानंतर आता बातमी समोर येत आहे की, सानिया मिर्झाने तिच्या दुबईतील घरातून तिचा माजी पती शोएब मलिकचे नाव (Sania Mirza has replaced ex husband Shoaib Malik name) हटवले आहे. सानिया मिर्झाने आता तिच्या दुबईतील घरावर शोएब मलिकच्या नावाऐवजी एखाद्या खास व्यक्तीचे नाव लिहिले आहे.


सानिया मिर्झाने कोणाचे नाव लिहिले?


SamaaTv च्या रिपोर्टनुसार, सानिया मिर्झाने तिच्या दुबईतील घरावर शोएब मलिकच्या जागी तिच्या मुलाचे नाव इझान लिहिले आहे. हा बदल सानिया मिर्झासाठी एक नवीन सुरुवात आहे, कारण ती तिच्या नवीन व्हिलामध्ये अनेक मोठे बदल करत आहे. सानिया मिर्झा आता मुलगा इझानसोबत या घरात राहण्याचा विचार करत आहे. वृत्तानुसार, व्हिलाचे काम पूर्णत्वास आले आहे आणि सानिया मिर्झाच्या शिफ्टिंगपूर्वी फक्त किरकोळ कामे बाकी आहेत.






तिचा मुलगा इझान हा तिचा सर्वात मोठा मित्र 


आपल्या मुलासोबत यूएईमध्ये दीर्घकाळ राहणाऱ्या सानिया मिर्झाने सांगितले की, इझान आता तिची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. सानिया मिर्झाने तिचा मुलगा इझान हा तिचा सर्वात मोठा मित्र असल्याचे सांगितले आहे. 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्न केल्यानंतर शोएब मलिकने आयशा सिद्दीकीला घटस्फोट दिला. 2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे हैदराबादमध्ये लग्न झाले होते. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2018 मध्ये आई-वडील झाले. 30 ऑक्टोबर 2018 रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म झाला.






सानियाने 2023 साली टेनिसला अलविदा केला


शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या 2022 पासून येत होत्या. सानियाने 2023 मध्ये व्यावसायिक टेनिसला अलविदा केला होता. तिच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने 43 WTA दुहेरी आणि एक एकेरी विजेतेपद पटकावले आहे. शोएब मलिक आणि सना जावेद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने शोएब मलिकसोबत दुसरे लग्न केले होते. सना जावेदचे पहिले लग्न 3 वर्षातच मोडले. सना जावेदने 2020 मध्ये पाकिस्तानी गायक उमेर जसवालसोबत लग्न केले होते, पण त्यानंतर 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.


इतर महत्वाच्या बातम्या