Samantha Ruth Prabhu Dating Life : साऊथ इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री समंथा रुतू प्रभू तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे तिची पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. समंथाचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असते. Samantha Ruth Prabhu Rumoured Boyfriend : अभिनेत्री समंथा रुतू प्रभू सध्या तिच्या डेटिंग लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर समंथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे. समंथाचं नाव सध्या एका दिग्दर्शकासोबत जोडलं जात आहे. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. समंथाचे एका दिग्दर्शकासोबतचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हा जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.


नागाचैतन्यच्या लग्नानंतर समंथालाही मिळालं प्रेम? 


अभिनेत्री समंथाने नागाचैतन्यपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर समंथाच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा आहे. नागाचैतन्यने दुसरं लग्न केल्यानंतर समंथाही तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन करत असल्याचं बोललं जात आहे. 37 वर्षीय समंथाचं नाव सध्या कोट्यधीश दिग्दर्शकासोबत जोडलं जात आहे. अभिनेत्री समंथा रुत प्रभू दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करत असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री समांथाचे पहिलं लग्न नागा चैतन्यशी झालं होतं, पण नंतर ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर नागाचैतन्यने शोभिता धुनिपालाशी लग्न केलं. त्यानंतर आता समंथाच्या आयुष्यातही प्रेमाची चाहूल लागल्याचं सांगितलं जात आहे. 


'या' दिग्दर्शकासोबत जुडलं नाव


मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर चार वर्षांनी  अभिनेत्री समंथा दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. समंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केला आहेत. दरम्यान, दोघांचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. समंथा रूथ प्रभूने अलीकडेच एका पिकलबॉल स्पर्धेला हजेरी लावली होती, ज्यांचे फोटो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये समंथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू एकत्र दिसत आहेत. त्यांच्या बॉन्डींगमुळे या फोटोंची चर्चा रंगली आहे.




समंथा - राजच्या अफेअरच्या चर्चांना उधाण


एका फोटोत दोघेही एकमेकांचे हात धरून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर, असा अंदाज लावला जात आहे की, समंथाने राजसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. राज निदिमोरू एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. राजने 'द फॅमिली मॅन', 'फरझी', 'सिटाडेल : हनी बनी' सारख्या अनेक वेब सीरिज बनवल्या आहेत. समंथाने दिग्दर्शक राजसोबत अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या समांथा राज आणि डीके सोबत 'रक्त ब्रह्मांड'वर काम करत आहे. सध्या या दोघांच्या नात्यांच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज किंवा समांथा दोघांनीही अद्याप डेटिंगच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : जेव्हा उदित नारायण यांनी स्टेजवरच श्रेया घोषाल अन् अलका याज्ञिक यांनाही केलं होतं KISS...; जुना व्हिडीओ व्हायरल