Indian Team Fielding Medal Ceremony : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी पदक समारंभाला सुरुवात केली. ज्यामध्ये सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देण्यात आले. आता 'फिल्डिंग मेडल सेरेमनी' पुन्हा एकदा परतली आहे, पण यावेळी नवा अवतार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून एका नव्या अवताराला सुरुवात झाली.
2023 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर पदके दिली जात होती, जी आता मालिकेत बदलली आहे. म्हणजेच आता संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देण्यात येणार आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सांगितले की, आता प्रत्येक सामन्याऐवजी संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला आम्ही पदक देऊ, ज्याला 'इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सीरीज' म्हटले जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेनंतर रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना नामांकन देण्यात आले होते. शेवटी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांनी सिराजला विजेता घोषित केले. क्षेत्ररक्षण पदक जिंकल्यानंतर सिराज म्हणाला, "मी विश्वचषकापासून या पदकाची वाट पाहत होतो, पण अखेर आज मला ते मिळाले." तिसर्या T20 मध्ये सिराजने अतिशय शानदार थ्रो मारून रीझा हेंड्रिक्सला धावबाद केले होते.
सूर्याने तिसऱ्या T20 मध्ये शतक ठोकले, कुलदीपच्या पाच विकेट
तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने 100 आणि यशस्वी जैस्वालने 60 धावा केल्या. सूर्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकार मारले होते. याशिवाय जैस्वालने 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 95 धावांत आटोपला.
इतर महत्वाच्या बातम्या