Ajit Pawar : कर्जत जामखेडच्या (Karjat Jamkhed)  एमआयडीसीच्या (MIDC) मुद्यावरुन आमदार राम शिंदे (Ram Shinde)  आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात जुंपली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, 'मग मी काय करु' असे उत्तर अजित पवार यांनी दिली. राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे अजित पवार म्हणाले. 


गुंतवणूक कशी होईल यासाठी महायुती प्रयत्नशील


कर्जत जामखेडच्या (Karjat Jamkhed)  एमआयडीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथं तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल, असा महायुतीचा प्रयत्न चालला असल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत तेथील आमदार राम शिंदे हे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील असल्याचे अजित पवार म्हणाले. ज्या ठिकाणी कर्जत जामखेडची एमआयडीसी प्रस्तावीत होती, तिथं नीरव मोदींची जमीन आहे, याबाबत अजित पवारांना विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले की, नीरव मोदीची भारतात येण्याची शक्यता फार कमी आहे. ते इथे आले तर त्यांच्यावर कारवाई होईल. आपण नियमांच्या चौकटीत बसून MIDC च्या संदर्भात काम करु असे अजित पवार म्हणाले. 


 



शेतकरी हाच केंद्रबिंदू, लवकरच मदत जाहीर केली जाणार


शेतकरी मुद्यावर देखील अजित पवारांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं आहे. शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. त्यामुळं शेतऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. ज्या ठिकाणी पंचनामे राहिलेत, त्याठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. हिवाळी अधिवेशन संपण्याआधीच शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. 


कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या प्रस्तावित एमआयडीसीचा एकूणच प्रस्ताव रद्दबातल करण्यात आला आहे. याबाबत नागपूर अधिवेशनादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्यासह उद्योग आणि एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित एमआयडीसीची जागा ही वादग्रस्त असल्याने हा प्रस्ताव रद्दबातल करण्यात येत असल्याचं यावेळी निर्णय झाल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे.  एमआयडीसी होण्यासाठी हवे असलेल्या विविध परवानग्या, निरीक्षणे विविध शासकीय समित्यांच्या परवानग्या घेण्यासाठी रोहित पवार प्रयत्नशील होते. याच मुद्यावरुन राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या आरोप प्रत्यारोप झाल्याचेही बघायला मिळाले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ram Shinde : रोहित पवारांचे स्वप्न म्हणजे 'मुंगेरीलाल के हसिन सपने'; राम शिंदे यांची युवा संघर्ष यात्रेवर टीका