कोलंबो: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने झटपट अर्धशतकानंतर, वेगवान शतक ठोकलं. कोहलीने 76 चेंडूत शतकाला गवसणी घातली. कोहलीचं हे वन डेतील 29 वं शतक आहे.
त्याआधी त्याने केवळ 38 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. अर्धशतकानंतरही कोहलीने त्याच्या फलंदाजीला वेसण न घालता, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई चालूच ठेवली.
कोहलीने 76 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार ठोकून शतक पूर्ण केलं.
वन डेमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (30) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (49) पुढे आहे.
कोहलीने या शतकासह श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला (28) मागे टाकलं.
दरम्यान, कोहलीपाठोपाठ सलामीवीर रोहित शर्माही शतकाकडे कूच करत आहे. कोहली-रोहित शर्माने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 200 धावांची भागीदारी रचली.
कोहलीचं वेगवान शतक, सर्वाधिक शतकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2017 04:20 PM (IST)
टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने झटपट अर्धशतकानंतर, वेगवान शतक ठोकलं. कोहलीने 76 चेंडूत शतकाला गवसणी घातली. कोहलीचं हे वन डेतील 29 वं शतक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -