22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.
या सामन्यातील पहिला गेम सिंधूनं 22-20 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने आपला खेळ उंचावला आणि हा गेम 21-11 असा जिंकत बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या गेममध्ये सिंधूनं जोरदार पुनरागमन करत तो 21-18 असा खिशात घातला.
ग्लास्गोमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारानं सिंधूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला आहे.
https://twitter.com/PBLIndiaLive/status/909310526903209984
सिंधूनं चीनच्या बिंगजियाओवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. सिंधूने बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला.