लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी अर्धा ते पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यांनतर दोघांनी एकत्रित भोजन घेतल्याचीही माहिती आहे.
फुट्सल लीगचं आयोजन अमित ठाकरेंनी केलं होतं. या स्पर्धेसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यानुसार आदित्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर फुट्सल लीग ही फुटबॉल स्पर्धा अमित ठाकरेंची संकल्पना आहे
अमित ठाकरे स्वत: फुटबॉलपटू आहेत. तर आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोघांची भेट केवळ फुटबॉलप्रेमानं झाल्याचं सांगितलं जात आहे. पण आदित्य आणि अमित ठाकरेंच्या भेटीने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे.