PV Sindhu Badminton World Championships : भारतीय बॅडमिंटन विश्वातील एक आघाडीची महिला खेळाडू पीव्ही सिंधू (PV Sindhu) दुखापतीमुळे आगामी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेला मुकणार आहे. 2019 साली नोजोमी ओकुहाराला मात देत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप (badminton world championship) जिंकणारी पीव्ही सिंधू यंदाच्या वर्षी स्पर्धेबाहेर गेल्याने भारताला मोठा तोटा होणार आहे.

  


सिंधूने आतापर्यंत केलेल्या दमदार खेळामुळे तसंच 2019 साली मिळवलेल्या जेतेपदामुळे तिला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ओळखलं जातं. त्यात नुकतच इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सिंधूनं महिला एकेरीत सुवर्णपदक मिळवलं. त्यामुळे ती चांगल्या फॉर्ममध्ये होतीय अशात ती बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही जिंकू शकली असती. पण दुखापतीमुळे आता ती स्पर्धेलाच मुकणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून सिंधू बाहेर गेल्यानंतर तिचे वडिल पीवी रम्मना यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले सिंगापुर ओपन आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर सिंधूचं दुखापतीमुळे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणं अत्यंत निराशाजनक आहे.


कॉमनवेल्थमध्ये सिंधूची सुवर्ण कामगिरी


कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत सुवर्णपदक घातलं.  कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच पीव्ही सिंधूनं आक्रमक खेळी दाखवली. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही पीव्ही सिंधूनं 21-13 च्या फरकानं जिंकून सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.  


ट्वीट-


हे देखील वाचा-