नवी दिल्ली : भारताची युवा धावपटू हिमा दास हिने आणखी एका सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. हिमाने चेक प्रजासत्ताकमध्ये नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिलं स्थान पटकावत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.


हिमाने ट्विटरवर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. फोटोसोबत हिनाने लिहिलं की, "आज चेक प्रजासत्ताकमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मी अव्वल स्थान पटकावलं आहे."





हिमाने 400 मीटर शर्यत 52.09 सेकंद वेळेत पूर्ण करत अव्वल स्थान पटकावलं. या शर्यतील हिमानंतर भारताच्या वीके विस्मयाने दुसरं स्थान पटकावलं. तर सरिता गायकवाडने तिसरं स्थान पटकावलं. या महिन्यातील हिमाचं हे पाचवं सुवर्ण पदक आहे.


हिमाची या महिन्यातील कामगिरी




  • 2 जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मी. शर्यतीत सुवर्ण पदक

  • 7 जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

  • 13 ला जुलै चेक प्रजासत्ताक येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

  • 18 जुलैला झेक प्रजासत्ताक टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक

  • 20 जुलै जेक प्रजासत्ताक नोवे मेस्टो नाड मेटुजी स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक


VIDEO | माझा 20-20 | सकाळच्या घडामोडींचा वेगवान आढावा