मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.
आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता भाजप देखील विधानसभेच्या तयारीसाठी जोमाने मैदानात उरतण्याच्या तयारीत असेल.
काय आहे भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा रोडमॅप?
21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 आॅगस्ट 2019 - जिल्हासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 आॅगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 आॅगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 आॅगस्ट - विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 आॅगस्ट ते 25 आॅगस्ट - विधानसभाश: बूथ कार्यकर्ता संमेलन
1 आॅगस्ट ते 12 आॅगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन)
16 आॅगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम
1 आॅगस्ट ते 31 आॅगस्ट - महाजनादेश यात्रा
15 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
कशी असेल भाजपची महाजनादेश यात्रा ?
महाजनादेश यात्रेची सुरुवात तिवसा तालुक्यातील मोझरी पासून 1 ऑगस्टला होणार आहे. तुकडोजी महाराजांच्या भूमीतून यात्रेचा प्रारंभ करण्याचं नियोजन आहे. पहिला टप्पा मोझरी ते नंदुरबार असा असणार आहे, तर दुसरा टप्पा अकोले ते नाशिक असा असणार आहे. नाशिकच्या तिर्थक्षेत्रात यात्रेचा समारोप होईल.
मुंबई वगळता 30 जिल्हे, 152 विधानसभा क्षेत्र, साडेचार हजार किमीचा प्रवास, सुमारे 300 सभा या यात्रेदरम्यान होणार आहेत. 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा होतील. यामध्ये एक मोठी विजयसंकल्प सभा प्रत्येक जिल्ह्यात होईल.
एलईडी रथावरून सरकारने केलेल्या कामांची चित्रफीत दाखवण्यात येईल. मित्रपक्षांच्या उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सर्वाधिक प्रयत्न असतील. प्रत्येक जिल्ह्यातील कोणाचाही पक्ष प्रवेश ऐन वेळेस केला जाणार नाही. प्रदेश कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असंही ठरलं आहे.
निर्वाचित सदस्य संमेलन
16 आॅगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)
तसंच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट
तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा - गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणपतींसाठी