India Women vs Australia Women : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. हा सामना जिंकताच टीम इंडिया इतिहास रचणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 261 धावा करून सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. स्नेह राणाने 4 बळी घेतले. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियासाठी ताहिला मॅग्राथने 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.






ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 219 धावांवर गारद झाला होता. यानंतर दुसऱ्या डावातही विशेष काही करता आले नाही. संपूर्ण संघ 261 धावा करून ऑलआऊट झाला. मुनी आणि लिचफिल्ड जोडी सलामीला आली. लिचफिल्ड 44 चेंडूत 18 धावा करून बाद झाली. तर मुनीने 33 धावा केल्या. एलिस पॅरी 91 चेंडूत 45 धावा करून बाद झाली. ताहिलाने 177 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. हिली 32 धावा करून बाद झाली, तर सदरलँड 27 धावा करून बाद झाली.


स्नेहने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. तिनं 22 षटकात 63 धावा देत 4 बळी घेतले. यासोबतच 5 मेडन ओव्हरही टाकल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 9 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. गायकवाडने 28.4 षटकात 42 धावा देत 2 बळी घेतले. 


भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या होत्या. सलामीवीर स्मृती मानधनाने 74 धावांची शानदार खेळी केली. तिने 12 चौकार मारले होते. शफाली वर्माने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावा केल्या होत्या. रिचा घोषनेही अर्धशतक झळकावताना 52 धावा केल्या. आता टीम इंडियाला विजयासाठी 75 धावा करायच्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या