Salaar Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सालार' या सिनेमाआधी प्रभासचे सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. अखेर आता हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. 


'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Salaar Box Office Collection)


'सालार' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची धमाकेदार कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 55 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 145.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'सालार' हा 2023 मधला सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.


'सालार' या सिनेमाच्या माध्यमातून प्रभासने दमदार कमबॅक केलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा सिनेमा सध्या गाजत आहे. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे. ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत सालारने शाहरुखच्या जवानलाही मागे टाकलं आहे. सालारने 90.7 कोटींची ओपनिंग कमाई केली आहे. तर जवानने 75 कोटींची ओपनिंग कलेक्शन जमवलं होतं. 






प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा बिग बजेट सिनेमा आहे. या पॅन इंडिया सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. प्रभाससह या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू रेड्डी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


'सालार' ऑनलाईन लीक


प्रभासचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पण रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. टेलिग्राम, तमिलरॉकर्स, मूर्वीरुल्झ, तमिलएमव्ही, फिल्मीझिला, इबोम्मा आणि टोरेंट यांसारख्या वेबसाइट्सवर एचडी प्रिंटमध्ये सालार हा सिनेमा प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यामुळे कमाईवर याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखसमोर कमाईच्या बाबतीत प्रभासचा सालार वरचढ आहे.


सेन्सॉरकडून सालारला मिळालं 'A' सर्टिफिकेट


 22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये  हा चित्रपट रिलीज होणार आहे. सालार पार्ट 1 ला  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (CBFC) म्हणजेच सेन्सॉरकडून'A' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम  2 तास आणि 55 मिनिटे एवढा असणार आहे. 


संबंधित बातम्या


Salaar Movie Review : प्रभासला अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढणारा सालार