Ind vs SL 2nd T20I :  कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका संघात दुसरा टी-20 दुसरा सामना खेळवण्यात आला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 4 विकेटने पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 135 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 


श्रीलंकेने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याआधी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात  चांगली झाली. पदार्पणात सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने संघाची चांगली सुरूवात केली. ऋतुराजने 18 बॉलमध्ये 21 धावा केल्या. . ऋतुराज बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कलने कर्णधार शिखर धवनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने 42 बॉलमध्ये 40 धावा केल्या. पडिक्कलने 29, भुवनेश्वरने 13, संजू सॅमसनने 7 धावा केल्या. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने दोन,  हसरंगा, शनाका आणि चमीरा यांनी प्रत्येकी  एक विकेट घेतली. भारताने 20 ओव्हरमध्ये 5विकेट गमावत 132 धावा केल्या.


भुवनेश्वर कुमारने टी20 इंटरनॅशनलमध्ये केले 50 विकेट पूर्ण


भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टी२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण केले. भारताकडून टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये  50 विकेट घेणारा भुवनेश्वर चौथा गोलंदार ठरला. भुवनेश्वरच्या अगोदर आर आश्विन, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलच्या नावावर हा रेकॉर्ड आहे.


क्रुणाल पांड्या  कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर क्रुणाल सह भारताचे 8 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतानं पहिली टी 20 मॅच देखील जिंकली आहे. दुसरा टी 20 सामना काल खेळला जाणार होता मात्र क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानं हा कालचा सामना आजवर ढकलण्यात आला.