India vs South Africa : टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकदिवसीय आणि टी-२० मधून ब्रेक घेतला आहे. एकदिवसीय संघावर नजर टाकली तर 3 नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. यासोबतच संजू सॅमसन आणि युझवेंद्र यांचाही वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच बीसीसीआयने रजत पाटीदार, रिंकू सिंह आणि साई सुदर्शन यांना पदार्पण करण्याची संधी दिली आहे.
वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्या दुखापग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद शमीची संघात वापसी झाली होती. यानंतर त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करताना तब्बल 24 विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिभेची खाण असूनही आत बाहेर सुरु असलेल्या संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल तसेच वनडे पर्दापणाची संधी मिळालेल्या रजत पाटीदार, रिंकू सिंह आणि साई सुदर्शन यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
संजू सॅमसनला वनडे संघात संधी मिळाली Sanju Samson (wk)
जून 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T-20 वर्ल्डकप होत आहे. त्या विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडियाने विश्वचषकानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली, पण त्या मालिकेतही संजू सॅमसनचे (Sanju Samson) नाव नव्हते, तर सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. आता दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी संजू सॅमसनला वनडे फॉरमॅटसाठी संघात ठेवले आहे, परंतु टी-20 किंवा कसोटीसाठी विचार केलेला नाही.
त्याच वेळी, जेव्हा एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू होती, तेव्हा संजूचा टी-20 संघात समावेश करण्यात आला होता, मात्र आता टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू असताना त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भारतीय संघ व्यवस्थापन 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकातही संजू सॅमसनचा समावेश करणार नाही. यामुळेच संजू सॅमसनचे चाहतेही सोशल मीडियावर बीसीसीआयवर टीका करत आहेत.
साई सुदर्शन (Sai Sudharsan)
पर्दापणाची संधी मिळालेला डावखुरा फलंदाज साई सुदर्शनचा (Sai Sudharsan) देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. तो टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. यासोबतच त्याने गोलंदाजीतही हात आजमावला आहे. सुदर्शनने 22 लिस्ट ए सामन्यात 1236 धावा केल्या आहेत. त्याने 31 टी-20 सामन्यात 976 धावा केल्या आहेत. त्याने 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 829 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 6 शतके आणि प्रथम श्रेणी सामन्यात 2 शतके झळकावली आहेत.
रिंकू सिंह (Rinku Singh)
टीम इंडियाची सर्वोत्तम युवा खेळाडू रिंकू सिंहचाही (Rinku Singh) वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूच्या कामगिरीने निवडकर्त्यांची मने जिंकली आहेत. त्याने 55 लिस्ट ए सामन्यात 1844 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. रिंकूने 42 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3007 धावा केल्या आहेत. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे.
रजत पाटीदार (Rajat Patidar)
रजत पाटीदार (Rajat Patidar) हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. त्याने 55 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1813 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. रजतने 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3795 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 11 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत. रजतचा टी-20 फॉरमॅटमध्येही शानदार रेकॉर्ड आहे. त्याने 50 सामन्यात 1640 धावा केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या