बारबाडोस : रोहित शर्मानं टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम फेरीच्या लढतीत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित अन् विराटनं आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, केशव महाराजनं दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताला दोन धक्के दिले. रोहित शर्मा आणि रिषभ पंतला केशव महाराजनं बाद केलं. भारतानं सुरुवातीला विकेट गमावल्यानं डावाची सर्व जबाबदारी विराट कोहलीवर आली आहे.
केशव महाराजनं भारताच्या डावाला सुरुंग लावला
भारतानं पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा काढल्या होत्या. भारताचं आक्रमक फलंदाजीचं धोरण पाहता एडन मार्क्रमनं दुसरी ओव्हर केशव महाराजला दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मानं पहिल्या दोन बॉलमध्ये दोन चौकार मारले होते. तिसरा बॉल डॉट गेला. चौथ्या बॉलवर रोहित शर्मा चौकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यानंतर रिषभ पंत केशव महाराजच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला.
सूर्यकुमार यादवही फेल
टीम इंडियाचा मिस्टर 360 आजच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये फेल ठरला. सूर्यकुमार यादव केवळ 3 धावा करुन रबाडाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
भारताची मदार विराट कोहलीवर
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत हे बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी विराट कोहलीवर आली आहे. विराट कोहलीनं भारताचा डाव एका बाजूनं सावरला आहे. विराट कोहलीनं अक्षर पटेलच्या साथीनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं लवकर तीन विकेट गमावल्यानंर रोहित शर्मानं अक्षर पटेलला प्रमोट करत फलंदाजीला पाठवलं. विराट आणि अक्षर पटेलनं महत्त्वाची भागिदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका :
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.
संबंधित बातम्या :
नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
India ICC Trophies : 1983 ते 2024... भारताने कधी अन् केव्हा आयसीसी स्पर्धा जिंकली?