India vs South Africa : भारतीय संघ (India vs South Africa) तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या आफ्रिकन दौऱ्यावर टीम इंडियाला तीन टी-20, तितकेच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात टी-20 सामन्यांनी होईल, ज्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असेल. भारतीय संघाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचाही टी-20 मालिकेसाठी युवा खेळाडूंवर विश्वास आहे. यजमान संघात असे काही खेळाडू आहेत जे भारतीय संघासमोर आव्हान उभे करू शकतात. अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...


एडन मार्करम Aiden Markram (c)


टी-20 मालिकेतील दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर असणार आहे. अशा परिस्थितीत मार्करमवर दुहेरी जबाबदारी असेल. 29 वर्षीय मार्करमचा टी-20 रेकॉर्ड खूपच प्रभावी आहे. मार्करमने 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1063 धावा केल्या आहेत, ज्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. मार्करमने भारताविरुद्ध केवळ चार टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 110 धावा केल्या आहेत. मार्करमही उपयुक्त फिरकी गोलंदाज आहे. मार्करमला सामोरे जाणे भारतीय संघासाठी सोपे नसेल.


हेनरिक क्लासेन  Heinrich Klaasen


दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा हा खेळाडू आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलण्यात पटाईत आहे. क्लासेनची विकेट भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची असेल. 32 वर्षीय क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत 41 टी-20 सामने खेळले असून 710 धावा केल्या आहेत. क्लासेनने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सरासरी 23.66 आहे. क्लासेनने भारताविरुद्धच्या 7 टी-20 सामन्यांमध्ये 210 धावा केल्या आहेत.


गेराल्ड कोएत्झी Gerald Coetzee 


या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2023 च्या क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. कोएत्झीने 8 सामन्यात 19.80 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. टी-20 मालिकेतही कोएत्झी दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी गेम चेंजर ठरू शकतो. कोएत्झीच्या उसळत्या चेंडूंबाबत भारतीय फलंदाजांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कोएत्झीने केवळ तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर केवळ तीन विकेट आहेत.


मार्को जॅनसेन Marco Jansen 


डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेनने 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आणि 9 सामने खेळून 17 बळी घेतले. जॅनसेन पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात पटाईत आहे, त्यामुळे भारतीय सलामीवीरांना त्याच्याबाबत खूप काळजी घ्यावी लागेल. बॅटने लाँग शॉट्स मारण्याची क्षमताही जॅनसेनकडे आहे. 23 वर्षीय जॅनसेनने दक्षिण आफ्रिकेसाठी तीन टी-20 सामने खेळले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.


केशव महाराज Keshav Maharaj


टी-20 मालिकेत भारतीय वंशाचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. केशवकडे मधल्या षटकांमध्ये धावगती नियंत्रित करण्याची तसेच विकेट घेण्याची क्षमता आहे. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना केशव महाराजांच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. केशव महाराज यांनी 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या