पुणे : बोटांचे रबरी ठसे आणि डोळ्यांच्या  (Pune Crime News) फोटोंचा वापर करून आधारकार्ड सेंटर चालवणाऱ्यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बिंग फोडलंय. दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ही त्यावेळी उपस्थित होते. राजस्थान सरकारकडून नागरी सुविधा केंद्रांसाठी देण्यात आलेला सेटअप होता. जो भोसरीतील शिवराज चांभारेने राजस्थानच्या तिघांकडून आणला होता. हा सेटअप वापरुन 36 वर्षीय महिला आणि दोन कामगार आधार कार्ड केंद्र चालवत होते.


आधार कार्डची नोंदणी करताना प्रत्येकवेळी ज्या व्यक्तीला सेटअप देण्यात आलाय त्याचे डोळे आणि बोटांचे ठसे स्कॅन करावे लागतात. त्यासाठी चांभारेने राजस्थानमधील तिघांच्या बोटांचे रबरी ठसे बनवून आणले होते, तर डोळे स्कॅन करण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचे वेगवेगळ्या अँगल फोटो काढून आणले होते. या रबरी ठश्यांच्या आणि डोळ्यांच्या फोटोंच्या साह्याने चांभारे हा गैरकारभार करत होता. इतकंच नव्हे त्याच्याकडे शाळांचे दाखले, शासकीय रूग्णालयांचे जन्म दाखले, नगरसेवकांचे लेटर हेड अशी बनावट कागदपत्रे आणि त्या सर्वांचे स्टॅम्प ही आढळून आले आहेत. 
  
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकली. दोघांनी मिळून 6 डिसेंबरला भोसरी येथील कृष्णा नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकली. तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी शिवराज चांभारे, 36 वर्षीय महिला आणि दोन कामगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


शिवराज प्रकाश चांभारे  (वय 40), स्वाती शिवराज चांभारे (वय 36) या दाम्पत्यासह धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय 24 , तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय 23, रा. आल्हाटवाडी, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी आधार कायदा 2016 नुसार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिवराज आणि स्वाती यांचे कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या नावाने दुकान आहे. तिथे त्यांचे अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे त्यांनी नागरिकांना भासवून बनावट कागदपत्र तयार करत होते. 


इतर महत्वाची बातमी-


Pradeep Kurulkar: देशाची सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याचा ठपका; डॉ. प्रदीप कुरुलकरांचा जामीन अर्ज फेटाळला


रुपाली चाकणकरांनी आम्हाला खोट्या आरोपात फसवले, संभाजी ब्रिगेडच्या प्रदीप कानसेंचा दावा