Kolkata : वर्ल्डकपमधील प्रत्येक सामन्यांमध्ये विक्रमांवर विक्रम रचत चाललेल्या किंग विराट कोहलीने आज बर्थडेला सुद्धा निराश न करता दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळे टीम इंडियाच्या डावाला आकार आला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि श्रेयसने संघाचा डाव सावरला.






दोघांनी दमदार खेळी केली. कोहलीने अर्धशतक करतानाच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पंधराशे धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा हा दुसराच भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी ही कामगिरी फक्त ब्लास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाच करता आली आहे.






त्याचबरोबर आणखी एक पराक्रम विराट कोहलीने आपल्या नावे या सामन्यामध्ये केला. त्यांने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 60 च्या सरासरीने 6000 धावा पूर्ण केल्या. या पराक्रमातून खेळाडूची प्रतिभा काय आहे ते लक्षात येते.






वर्ल्डकपमध्ये कोहलीची बॅटिंग दमदार झाली आहे. मागील आठ डावांमध्ये सहापेक्षा अधिकवेळा त्याने अर्धशतकाहून अधिक धावा केल्या आहेत.






आजच्या सामन्यामध्ये श्रेयसने मागील सामन्यातील कामगिरी सुरूच ठेवताना दमदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे दोघांनी टीम इंडियाला 200 च्या पार नेले. 






इतर महत्वाच्या बातम्या