अहमदाबाद : विश्वविजेत्या इंग्लंडने हरण्याची परंपरा पुढे नेत विश्वचषक 2023 मध्ये आणखी एक सामना गमावला आणि वर्ल्डकपमधूनही बाहेर पडला. इंग्रजांचा शनिवारी ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी पराभव झाला, बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा हा सलग पाचवा पराभव ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला 49.3 षटकात 286 धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 4 बळी घेतले. डाव संपल्यानंतर इंग्लिश संघ 287 धावांचे लक्ष्य गाठून आज आपला दुसरा विजय मिळवेल असे वाटत होते, परंतु स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्यांना सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि मलानने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या, ज्यामुळे संघाला कोणत्याही प्रकारे मदत होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 3 बळी घेतले. झम्पाने फलंदाजी करताना 29 धावा केल्या होत्या.
इंग्लंड इतर संघांच्या कामगिरीवर ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होणार की नाही हे स्पष्ट होणार
वर्ल्डकपमध्ये केलेल्या अत्यंत खराब कामगिरीमुळे आता इंग्लंड संघावर वर्ल्डकपमधून बाहेर जाण्याची वेळ आलीच आहे, पण वर्ल्डकपसह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय होणार की नाही? यावर सुद्धा आता टांगती तलवार आली आहे. आता इंग्लंडसाठी इतर संघांच्या कामगिरीवर ते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे इंग्लंडला आता पुढील दोन सामन्यात नेदरलँड आणि पाकिस्तानला हरवण्यासह इतर संघांच्या कामगिरीवर सुद्धा अवलंबून राहावं लागणार आहे. वर्ल्डकपमध्ये श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाला आता बांगलादेशविरुद्ध विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारताने नेदरलँडविरुद्ध विजय मिळवावा लागेल तरच इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होता येणार आहे.
अन्यथा इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासामधील ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट असणार आहे. इंग्लंड हा या स्पर्धेमध्ये विश्व विजेता म्हणून आला होता. मात्र, त्यांना अवघा एक विजय मिळवता आला, तर सर्व सामन्यांमध्ये आतापर्यंत पराभव स्वीकाराव लागला आहे. त्यामुळे इंग्लंडची टीम वर्ल्डकपमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता ते चॅम्पियन्स ट्रॉफीला पात्र होतात की नाही? हे आता इतर संघांच्या कामगिरीसह शेवटचे दोन सामने सुद्धा जिंकावे लागणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या