जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून (Mahayuti Government) सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग आहे. गॅझेट लागू झाल्याने सगळ्यांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील, असे त्यांनी म्हटले आहे.


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हैदराबाद गॅझेट विषयीच्या काल-परवाच्या हालचाली नाहीत, आमची एक वर्षापासूनची ही मागणी आहे. ती आता लागू करण्याच्या हालचाली चालू आहेत. हे गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे यश आहे. माझं यश नाही. या आजच्या हालचाली नाहीत, तीन महिन्यापासूनची हालचाल आहे. शंभूराजे देसाई साहेबांनी तीन महिन्यापासून याबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. आम्हाला सगेसोयरेची अंमलबजावणी पाहिजे आहे. 


मुख्यमंत्र्यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग


मुख्यमंत्र्यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग आहे. मी रोज म्हणतो मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात.  तो विश्वास कसल्या माकडाचा ऐकून मुख्यमंत्र्यांनी ढळू देऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की, संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदारांचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी दगाफटका करू नये. अजिबात चाल खेळू नका, असे त्यांनी म्हटले. 


...तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील


मुख्यमंत्री शिंदेंना समाज मानतो. मात्र हे दोघं तिघं शिंदे साहेबांचे कान भरतील. शिंदे साहेबांनी दगा फटका केला तर ते मराठ्यांच्या नजरेतून उतरतील. तिन्ही गॅझेट लागू करा. काही लोकांचा समाजाच्या विरोधात गेम करण्याच्या डाव आहे. मी मुख्यमंत्र्यांना हुशार करत आहे. दोघांचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील, असा इशारा त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.


...तर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हेच जबाबदार


ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केले तरी आरक्षणाशिवाय त्यांची भर निघणार नाही. राज्यात काही कुठे झालं तर त्याला देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ जबाबदार राहणार आहेत. हे दोनच लोक दंगली घडवून आणणार आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


गॅझेट लागू झाल्याने सगळ्यांना फायदा होणार


सध्या राज्यात विविध पक्षातून आंदोलन उभी केली जात आहेत. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार आहे. ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यात नाराज असण्याचे कारण नाही. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस दंगली घडवायला लावतील. पण राज्यात फक्तं गालबोट लागता कामा नये. माझ्या एकाही माणसाला त्रास होता कामा नये. कुणी कितीही आंदोलन करा. गॅझेट लागू झाल्याने सगळ्यांना फायदा होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा 


Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र