Afghanistan war :  ऑस्ट्रेलियातील अनेक वरिष्ठ संरक्षण लष्करी कमांडर्सची सेवा पदके काढून घेतली जाणार आहेत. अलजझीराच्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये (war crimes committed during the Afghanistan war) युद्ध गुन्ह्यात काही सैनिक आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन संसदेत ही घोषणा केली. ब्रेरेटन अहवाल 2020 मध्ये प्रसिद्ध झाला. अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियन सैनिकांनी बेकायदेशीरपणे 39 लोकांची हत्या केल्याचा पुरावा सापडला आहे. संरक्षण मंत्री मार्लेस म्हणाले की, ही आमच्यासाठी नेहमीच राष्ट्रीय लाजिरवाणी बाब राहील.


त्या सैनिकांवर खटला चालवण्याचा विचार


अहवालानुसार, ज्या सैनिकांचे पुरस्कार हिसकावले गेले, त्यांची नावे मार्ल्स यांनी उघड केली नाहीत. मात्र, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संख्या 10 च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. या सैनिकांवर खटला चालवण्याचा विचार केला जात असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.


ऑस्ट्रेलियन सैनिक अफगाणिस्तानात लढण्यासाठी गेले होते


बीबीसीच्या वृत्तानुसार 2001 ते 2013 दरम्यान, 39 हजारांहून अधिक ऑस्ट्रेलियन सैनिक अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढण्यासाठी गेले होते. अमेरिकेवर 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर त्यांना तालिबान, अल कायदा आणि इतर इस्लामिक गटांशी लढण्यासाठी पाठवण्यात आले होते. 2016 मध्ये काही ऑस्ट्रेलियन सैनिकांनी तेथे युद्ध गुन्हे केल्याचे उघड झाले होते. यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आणि मेजर जनरल पॉल ब्रेरेटन होते. त्यांच्या नावाने समिती ओळखली जाते.


ब्रेरेटनचा अहवाल चार वर्षांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झाला. अफगाणिस्तानात तैनात असलेल्या ऑस्ट्रेलियन सैनिकांनी कैदी आणि नागरिकांची हत्या केल्याचे सांगण्यात आले. अहवालानुसार, याची सुरुवात 2009 मध्ये झाली आणि त्याच्याशी संबंधित सर्वाधिक घटना 2012-13 मध्ये घडल्या. या गुन्ह्यात किमान 25 जणांचा सहभाग होता. ज्या लोकांनी हे केले त्यापैकी बहुतेक लोक हे सैनिक होते जे पहिल्यांदा युद्धासाठी गेले होते.


सरावासाठी निष्पाप लोकांचे प्राण घेतले


ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र एबीसी न्यूजनुसार, या सैनिकांनी केवळ सरावाच्या नावाखाली निष्पाप लोकांची हत्या केली. ऑस्ट्रेलियामध्ये तैनातीनंतर प्रथमच एखाद्या सैनिकाने एखाद्या गुन्हेगाराला चकमकीत ठार केले तर त्याला 'ब्लडिंग' म्हणतात. सामान्यत: एखादा सेनापती गस्तीवर गेला की, तो त्याच्या कनिष्ठाला 'ब्लडिंग' करण्याचे आदेश देत असे. हत्या केल्यानंतर ते मारल्या गेलेल्या लोकांकडे शस्त्रे ठेवत असत. यानंतर तो रेडिओ सेटवरून संदेश पाठवत असे की, त्याची दहशतवाद्यांशी चकमक झाली असून त्यात तो मारला गेला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या