Hockey 5s Asia cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात रंगतदार सामना सुरु आहे. पण तिकडे हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हॉकी 5S आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर 6-4 असा विजय मिळवला आहे. मनिंदर ,मोहम्मद रहील,पवन राजभर आणि गुरजोत सिंह यांनी आपल्या सर्वोच्च खेळाचं प्रदर्शन केले. भारतीय संघावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हॉकीच्या मैदानात जिंकलो आता क्रिकेटच्या मैदानात काय होणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. 






हॉकीच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानचा संघ एकवेळ 3-2 असा आघाडीवर होता. पण भारतीय खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये आपला खेळ उंचावला. दोन सत्राचा खेळ संपला तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत सुटला होता. सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानच्या संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. पण भारताने दमदार कमबॅक केले. 


पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 6-4 असा विजय मिळवला.  या विजयासह भारताने आशिया चषक 5एस चषकावर नाव कोरले. भारताने मलेशियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्तानने ओमानला हरवत फायनल गाठली होती. फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत चषकावर नाव कोरले आहे.






पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानच्या संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या हापमध्ये जरदबस्त खेळाचे प्रदर्शन केले. पाकिस्तनाच्या संघाला थोडाही वाव दिला नाही. पॅनेल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून मनदीर सिंह याने विजयात मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानचा संघ 2-4 ने आघाडीवर होता. त्यानंतर मनिंदर सिंह याने झटपट गोल करत 2-2 अशी आघाडी मिळवली. शूटआऊटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला एकही गोल करता आला नाही. शूटआऊट भारताने 2-0 च्या फरकाने जिंकला. 


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानचा संघ उपविजेता ठरला. तर मलेशिया संघ तिसऱ्या क्रमांकावर रहिला. भारत, पाकिस्तान आणि मलेशिया संघ Fih hockey 5s World cup 2024 साठी पात्र ठरले आहेत. हा विश्वचषक 24-31 जानेवारी यादरम्यान रंगणार आहे.