England vs India Manchester Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 10 सप्टेंबरला मैनचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड येथे खेळवण्यात येणार आहे. परंतु या सामन्यावर आता कोरोनाचे सावट आहे. कारण भारतीय संघाच्या सपोर्ट टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आसी असून त्यांना हॉटेलमध्ये आयोसोलेट केले आहे. जर खेळाडूपैकी कोणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर पाचवा कसोटी सामना रद्द करण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सौरव गांगुली म्हणाले की, सध्या उद्याची मॅच होईल की नाही या बाबत शंका आहे. उद्याची मॅच होण्याची शक्यता फारच कमी आहे.
भारतीय संघाच्या सपोर्ट टीममधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली आहे. भारतीय संघाचे ज्युनिअर फिजीओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उद्या सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्याची भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान लंडन येथे झालेल्या ओव्हल येथील चौथ्या कसोटी सामन्या दरम्यान भारतीय संघाचे हेड कोच रवि शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या तिघांना 10 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात ते टीम इंडियासोबत नाही.
भारताने जेव्हा पाचवा कसोटी सामना जिंकला त्यावेळी फक्त फलंदाजी कोच विक्रम राठोड टीम इंडियासोबत होते. टीम इंडियाने कसोटी सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. परंतु आता एक सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मॅचवर कोरोनाचे सावट असून रद्द होण्याची शक्यता आहे.