Indian Navy SSCO Recruitment 2021: भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर (Career) करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसरच्या (SSC Officer) 181 पदांसाठी जाहिरात जारी केली आहे. अभियांत्रिकी (Engineering) पदवी पूर्ण केलेले पुरुष आणि महिला उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. नौदलाच्या नियमांनुसार या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
भारतीय नौदलाच्या अधिसूचनेनुसार 181 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. सर्व उमेदवारांनी 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज फी जमा करावी. सध्या भरती परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही.
अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहे?
तांत्रिक शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये बी टेक (B.Tech) किंवा त्याच्या समकक्ष अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. शिक्षण शाखेच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, 55% गुणांसह एमए पदवी पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण भरती अधिसूचना पाहू शकता.
वयोमर्यादा आणि अर्ज फी
वयोमर्यादेबद्दल बोलताना, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांची जन्मतारीख 2 जुलै 1997 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान असावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सर्व श्रेणींसाठी अर्ज विनामूल्य आहेत.
याप्रमाणे अर्ज करू शकता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत भरती वेबसाइट www.joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी लागेल. तिथं त्यांना या भरतीची अधिसूचना मिळेल, डाऊनलोड केल्यानंतर ते नीट वाचा. यामध्ये तुम्हाला अर्जाच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI