India vs England, 4th Test LIVE Updates: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव, मालिका 3-1 ने जिंकली

India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखलं. दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर खेळीच्या बळावर चांगली आघाडी घेतली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2021 03:57 PM
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव, अश्विन आणि अक्षरने घेतल्या प्रत्येकी पाच-पाच विकेट
भारताचा चौथ्या कसोटीमध्ये दणदणीत विजय. एक खेळी आणि 25 धावांनी सामना जिंकला.
लॉरेंसचं अर्थशतक. जिथं इंग्लंडच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टीकाव धरता येणंही कठीण होऊन बसलं आहे, तिथे लॉरेंसनं अर्धशतकी खेळी पूर्ण केली आहे.
टीम इंडिया विजयापासून चार पावलं दूर, चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था 91 वर 6 विकेट्स, अश्विन, अक्षरनं घेतल्या प्रत्येकी तीन विकेट
इंग्लंडला सलग दुसरा धक्का, 10 धावांवर क्राऊलीनंतर बेयरस्टो शून्यावर बाद, अश्विनला हॅटट्रिकची संधी
टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला, भारताचा स्कोर 365 वर ऑलआऊट, वॉशिंग्टन सुंदर 96 वर नाबाद
इंग्लंडला 10 धावांवर पहिला धक्का, क्राऊली पाच धावांवर बाद, अश्विनच्या गोलंदाजीवर रहाणेनं घेतला झेल
अक्षर पाठोपाठ इशांतही बाद, शून्यावर झाला बाद, टीम इंडियाचा स्कोर 9 बाद 365, वॉशिंग्टन सुंदर शतकापासून चार धावा दूर
अक्षर पटेल रन आऊट, अर्धशतक हुकलं, टीम इंडियाचा स्कोर 8 बाद 365, वॉशिंग्टन सुंदर शतकापासून चार धावा दूर
टीम इंडियाच्या साडेतीनशे धावा पूर्ण, इंग्लंडवर मोठी आघाडी, सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर, अक्षर पटेलचीही धडाकेबाज खेळी
टीम इंडियाच्या तीनशे धावा पूर्ण, इंग्लंडवर मोठी आघाडी, सुंदरची धडाकेबाज खेळी

पार्श्वभूमी

India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. ज्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र भारताचा डाव काहीसा सावरताना दिसला.


 


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 94 षटकांच्या खेळामध्ये भारतीय संघाची धावसंख्या 7 गडी बाद 294 धावा इतकी होती. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर यानं 60 धावांचं योगदान दिलं. तर, त्याची साथ घेत ऋषभ पंतनं चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. शतकी खेळी केल्यानंतर 101 वी धाव करत ऋषभ पंत झेलबाद झाला. ज्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा पाहायला मिळाली.


 


पंतचं हे कसोटी क्रिकेटमधील तिसरं शतक ठरलं तर, भारतीय भूमीत त्यानं केलेलं हे पहिलं कसोटी शतक ठरलं. दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे खेळाडू खेळपट्टीवर अनुक्रमे 60 आणि 11 धावांसह टिकून होते. सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाकडे 89 धावांची आघाडी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.