India vs England, 4th Test LIVE Updates: भारताला आठवा धक्का, अक्षर पटेल 43 धावांवर बाद
India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2021 11:06 AM
पार्श्वभूमी
India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य आहे. अहमदाबादच्या...More
India vs England, 4th Test, Live Cricket Score Updates : टीम इंडिया-इंग्लंडमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्य आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात मात्र फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाने पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 24 धावा केल्या. यापूर्वी अक्षर पटेलनं उत्तम खेळी करत केवळ 68 धावा देत चार विकेट्स घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजाराने 36 चेंडूंवर एक चौकार लगावत 15 धावा आणि रोहित शर्माने 34 चेंडूंवर एक चौकार लगावत आठ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या वतीने जेम्स एंडरसनने एक विकेट घेत शुभमन गिलला खातं न खोलताच माघारी धाडलं. दरम्यान, इंग्लंडचा स्टार स्पिनर जॅक लीच पहिल्या दिवशी फारशी चांगली खेळी करु शकला नाही. त्याने चार ओव्हर्समध्ये 16 धावा केल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दुसऱ्या दिवसअखेर 94 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून, खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या 7 गडी बाद 294 धावा इतकी होती. दुसऱ्या दिवशी चर्चेत राहिली ती म्हणजे ऋषभ पंतची शटकी खेळी आणि त्याला मिळालेली वॉशिंग्टन सुंदरची साथ