Ind vs Eng 2021  अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अखेर विजयी पताका उंचावली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार याबद्दलचं चित्र अस्पष्ट होतं. सुरुवातीच्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजाची घसरगुंडी आणि त्यानंतर मधल्या फळीनं केलेली कमाल पाहता संघानं विरोधी बाजूला असणाऱ्या इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचं आव्हान ठेवलं. 


भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचे खेळाडू खेळपट्टीवर आले. पण, कमालीच्या जिद्दीनं मैदनाता उतरलेल्या भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. सलामीवीरांच्या वाट्याला अपयश येतानाचं चित्र असतानाच इंग्लंडच्या संघालाही सामन्यावर पकड मिळवण्यासाठी अखेरच्या विकेटपर्यंत प्रत्येक खेळाडूच्या योगदानाची साथ मिळाली. सॅम करननं संघाला विजयाच्या दारापर्यंत आणून सोडलं, अखेरच्या चेंडूपर्यंत त्यानं सामना जिंकण्यासाठीचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण, अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. 


IPL 2021 | आयपीएलमध्ये वादग्रस्त 'सॉफ्ट सिग्नल' नियम नसणार, बीसीसीआयचा निर्णय


भारताच्या वतीनं भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि नटराजन या खेळाडूंसह हार्दिक पांड्यानंही विरोधी संघाची धावसंख्या रोखण्याचे प्रयत्न केले. 






ऋषभ पंत, शिखर धवन, हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियानं सर्वबाद 329 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियाला शतकी सलामी दिली. रोहित 37 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या कर्णधार कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. तो 7 धावांवर बाद झाला. मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. या दरम्यान पंतने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या.






फलंदाजीमागोमाग संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडवर वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली खरी. पण, क्षेत्ररक्षणाच्या वेळी काही प्रसंगी अतिशय महत्त्वाचे झेल संघातील खेळाडूंकडून निसटले. परिणामी सामना नेमकं जिंकणार कोण याची उत्सुकता अखेरच्या क्षणापर्यंत ताणून राहिली होती.