INDvsAUS 2nd Test : 'बॉक्सिंग डे' कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजानं फिटनेस टेस्ट पास केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाडेजा उपलब्ध असणार आहे. जाडेजाला हनुमा विहारीच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. जाडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात स्नायूंची दुखापत झाली. त्याच लढतीत मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू डोक्यावर आदळल्याने डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांसह पहिल्या कसोटीलाही जाडेजाला मुकावे लागले.


आता या दोन्ही दुखापतींतून जडेजा पूर्णपणे सावरला असून त्याने सरावालाही प्रारंभ केला आहे. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात जाडेजानं आपल्या अष्टपैलू खेळीनं भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन होतं. मात्र जाडेजा फिट झाल्यामुळे भारतीय संघानं सुटकेचा श्वास सोडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा झालेला मानहानीकारक पराभव झाल्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाडेजाची निवड जवळपास नक्की समजली जात आहे.


वाचा : Aus vs Ind 1st Test | पृथ्वी शॉ पुन्हा फ्लॉप; मीम्सचा पाऊस पाडत नेटकऱ्यांनी झोडपलं


बॉक्सिंग डे (Boxing Day Test) कसोटीपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापन अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर बारीक नजर ठेवून आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा या दोन्ही दुखापतींतून पूर्णपणे सावरला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. जाडेजा संघात आल्यास हनुमा विहारीला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात खराब कामगिरीमुळे विहारीला संघाबाहेर ठेवणं हे कारण नसून, अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांना सर्वोत्कृष्ट टीम मैदानात उतरवायची आहे.


Boxing day test: कसं पडलं 'बॉक्सिंग डे टेस्ट' नाव, काय आहे यामागचा इतिहास?


मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. अ‍ॅडलेड येथील प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी क्रिकेटमधील भारताची नीचांकी धावसंख्या नोंदवली. त्यातच कोहली आता पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतणार असल्याने जडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे. तरी देखील अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे.


मोहम्मद शमीच्या जागी खेळणार 'हाखेळाडूकरणार कसोटी पदार्पण


ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. आगामी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते मोहम्मद सिराज मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो. सिराजनं सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती.