Boxing Day Test : 'बॉक्सिंग डे' चे नाव ऐकल्यावर जवळजवळ प्रत्येकालाच बॉक्सिंग खेळ आठवतो, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्सिंग डेचा या खेळाशी काहीही संबंध नाही. दरम्यान जगभरात बर्‍याच ठिकाणी ख्रिसमसचा (25 डिसेंबर) पुढील दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया दरवर्षी या दिवशी कसोटी सामन्याला सुरूवात करते आणि त्याला 'बॉक्सिंग डे टेस्ट' म्हणतात. ऑस्ट्रेलिया यंदा मेलबर्न येथे 'बॉक्सिंग डे टेस्ट' खेळणार आहे.


स्टीफन डेच्या नावानेही बॉक्सिंग डे' ओळखला जातो


पाश्चात्त्य ख्रिश्चन धर्माच्या दिनदर्शिकेत ‘बॉक्सिंग डे’ हा ख्रिसमसचा दुसरा दिवस असतो आणि याला ‘स्टीफन डे’च्या नावानेही ओळखले जाते. कॅटलोनिया, आयर्लंड आणि स्पेन येथे हा सेंट स्टीफन डे म्हणून साजरा केला जातो.


बॉक्सिंग डेचा इतिहास 


26 डिसेंबर या दिवसाला 'बॉक्सिंग डे' हे नाव कसे पडले याविषयी बर्‍याच कथा आहेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हा दिवस सन 1830 आणि ब्रिटनशी जोडते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की ख्रिसमसच्या नंतर आठवड्यातील हा पहिला दिवस आहे.


यात असे देखील म्हटले आहे की, हा दिवस सुट्टीचा दिवस असतो. या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना ख्रिसमस बॉक्स मिळतो. या बॉक्सच्या परंपरेला बॉक्सिंग डे असे नाव देण्यात आले असावे.


ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे  टेस्ट फक्त मेलबर्नमध्ये खेळते


ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ दरवर्षी 26 डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर कसोटी सामना खेळते आणि हाच कसोटी सामना ‘बॉक्सिंग डे  टेस्ट’ म्हणून ओळखला जातो. यंदा ऑस्ट्रेलिया भारताबरोबर हा सामाना खेळणार आहे. गेल्या वर्षीदेखील ऑस्ट्रेलियाने  भारताबरोबर ‘बॉक्सिंग डे  टेस्ट’ खेळली होती.


याच दिवशी दक्षिण आफ्रिका देखील दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट खेळते. यावर्षी दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे  टेस्ट’ खेळेल. मागील वर्षी त्यांनी पाकिस्तानबरोबर ‘बॉक्सिंग डे  टेस्ट’ खेळली होती.