India vs Australia 2023 World Cup Final : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 241 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल भारताने निश्चितपणे ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे धक्के दिले, परंतु ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी टीम इंडियाच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस डेडने 137 धावांची शानदार खेळी केली. तर मार्नस लॅबुशेनने 58 धावांची नाबाद खेळी खेळली.


ट्रॅव्हीस हेड फायनला सामन्याचा अन् किंग कोहली ठरला वर्ल्डकपचा मानकरी


सेमीफायनलमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस डेड विजयाचा शिल्पकार झाला होता. फायनलमध्येही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. त्याने केलेल्या 137 धावांच्या खेळीने सामनावीर ठरला.


किंग कोहली वर्ल्डकपचा मानकरी 


संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीने धडकी भरवलेला किंग कोहली वर्ल्डकपचा मानकरी ठरला. आजच्या सामन्यातही त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली, पण दुर्दैवीरित्या बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत त्याने 765 धावांचा पाऊस पाडला. वर्ल्डकपच्या इतिहासात ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. दुर्दैवाचा फेरा म्हणजे सचिन तेंडुलकरनेही 2003 मध्ये धावांचा पाऊस पाडताना वैयक्तिक सर्वाधिक 673 धावा केल्या होत्या, पण वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियानेच अंतिम सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव केला होता. 






ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी अपेक्षा पूर्ण केल्या


ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यासमोर टीम इंडियाची गोलंदाजी अगदी सामान्य दिसत होती. मात्र, मोहम्मद शमी आणि बुमराह यांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे धक्के नक्कीच दिले, त्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या. ट्रॅव्हिस हेडनेही भारतीय फिरकी गोलंदाज चांगला खेळला. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या विकेट लवकर पडल्याने भारताला ते दडपण कायम राखता आले नाही.






हेड आणि लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. हेडने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 5 षटकार मारले. लॅबुशेनच्या बॅटमधून चार चौकार आले. या दोघांनीही भारतीय गोलंदाजांचा सहज खेळ करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला.


ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला


हा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने 6 विश्वचषक जिंकले आहेत. या सामन्यात मार्नस लॅबुशेनने ट्रॅव्हिस हेडला चांगली साथ दिली. लॅबुशेनने आपल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.






भारताने 241 धावांचे लक्ष्य दिले होते


भारताची सुरुवात चांगली झाली नाही, शुभमन गिल लवकर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, कर्णधार रोहित शर्माने आपली लय कायम ठेवत शानदार फलंदाजी केली. याशिवाय भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर बुमराहने भारताकडून सर्वाधिक 2 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.