India vs Australia 2023 World Cup Final : भारतात आयोजित केलेल्या विश्वचषकाच्या मेगाफायनलच्या महामुकाबल्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. भारत तिसऱ्यांदा आणि ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विजेतेपदाच्या लढतीसाठी आमनेसामने असतील. भारतीय संघासाठी वनडे विश्वचषकाची ही चौथी उपांत्य फेरी असेल. याआधी झालेल्या तीन फायनलमध्ये आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला शतक करता आलेले नाही. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आतापर्यंत केवळ 6 महान खेळाडूंनी शतके ठोकली आहेत.
1883 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतही भारताने अनेक शतके झळकावली, जेव्हा मेन इन ब्लू जगज्जेते झाले. 2011 मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. मात्र, श्रीलंकेसाठी महेला जयवर्धनेने शतकी खेळी खेळताना नाबाद 103 धावा केल्या. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे, ज्याने 2007 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 149 धावा केल्या होत्या.
विश्वचषकात शतके झळकावणारे 6 दिग्गज
1975 मध्ये म्हणजे एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत, वेस्ट इंडिजचा तत्कालीन कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदाच्या सामन्यात शतक (102) केले होते. वेस्ट इंडिजने पहिला वर्ल्डकप जिंकला होता. यानंतर 1979 च्या स्पर्धेत वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात शतक झळकावले. विजेतेपदाच्या सामन्यात, वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांनी नाबाद 138 धावांची नाबाद खेळी खेळली. 1979 मध्येही वेस्ट इंडिज विजेता ठरला.
यानंतर, 1996 च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, विजयी संघ श्रीलंकेच्या अरविंद डी सिल्वाने नाबाद 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने (140*) शतक, 2007 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट (149) आणि 2011 मध्ये श्रीलंकेच्या महेला जयवर्धने (103*) यांनी शतक झळकावले. 2011 नंतर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकही शतक झाले नाही.
टीम इंडियाच्या इतिहासात शतक नाहीच
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल 49 शतके मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. किंग कोहलीनं हाच पराक्रम मोडित काढताना 50व्या विश्वविक्रमी शतकाची नोंद केली. मात्र, टीम इंडियाच्या कोणत्याच फलंदाजाला आजवर वर्ल्डकपच्या फायनलमध्ये शतक करता आलेलं नाही. 1983 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला, त्यामध्ये शतकाची नोंद नव्हती. त्यानंतर 28 वर्षांनी टीम इंडियाने मायदेशात 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला, पण फायनलला शतकाची नोंद झाली नाही. त्यामुळे हा वनवास ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपणार का? याची उत्सुकता आहे.
20 वर्षापूर्वीची पाँटिंगच्या शतकाची आठवण
20 वर्षापूर्वी म्हणजेच सौरभ गांगुली यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, पाँटिंगने दिलेल्या नाबाद 140 धावांचा तडाखा आजही कोट्यवधी भारतीयांच्या स्मरणात आहे. त्यानंतर 2011 मध्येही फायनलमध्येच महेला जयवर्धनेनं टीम इंडियाविरुद्ध शतक झळकावले होते. मात्र, टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकल्याने या शतकाची तीव्रता स्मरणात राहिली नाही. मात्र, 20 वर्षापूर्वीचा बदला घेण्याची संधी आता टीम इंडियासमोर आहे यात शंका नाही. टीम इंडियाचे टाॅप फाईव्ह फलंदाजांनी वर्ल्डकपमध्ये धडकी भरवली आहे. त्यामुळे फायनलमध्ये पराभवाचा आणि शतकाचा बदला पूर्ण होईल, अशी आशा करायला हरकत नाही.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतके ठोकणारे फलंदाज
149 - अॅडम गिलख्रिस्ट विरुद्ध श्रीलंका, 2007140* - रिकी पाँटिंग विरुद्ध भारत, 2003138* - व्हिव्ह रिचर्ड्स विरुद्ध इंग्लंड, 1979107* - अरविंदा डी सिल्वा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1996103* - महेला जयवर्धने विरुद्ध भारत, 2011102 - क्लाइव्ह लॉईड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1975
इतर महत्वाच्या बातम्या