पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक नामदेव जाधव (Namdeo Jadhav) यांना काळं फासलं. त्यानंतर नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवारांचं असेल. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव यांनी यावेळी म्हटलं . 


शरद पवार हे ओबीसी असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी एक पत्रक सादर करुन केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुण्यात कार्यकर्ते आक्रमक होत नामदेव जाधवांवर हल्ला केला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काळं फासलं. 


नेमकं काय घडलं? 


शरद पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं. पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमासाठी नामदेव जाधव पोहचले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.  


पुण्यात कार्यकर्ते आक्रमक


शरद पवारांविरोधात टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. नामदेव जाधव यांच्याविरोधात खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा व्यक्तीने शरद पवारांविरोधात टीका करणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नामदेव जाधव करत असलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.


जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडणार होता तेव्हा पोलीस तिथे हजर नव्हते. पण काहीच वेळात पोलीस तिथे दाखल झाले. दरम्यान कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


हेही वाचा : 


Namdeo Jadhav : पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक